Tuesday, November 11, 2014

देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती. हा दिवस देशभर शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्त सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांना खास शुभेच्छा.
मौलाना अबुल कलाम आझाद यांना विनम्र अभिवादन _/\_
#Satara #Maharashtra #National_Education_day  Nationalist Congress Party - NCP


Friday, November 7, 2014

#राष्ट्रवादीचा #हिरा #Shashikant_Shinde
Ex.Maharashtra Water Resources Minister & MLA Koregoan constituency


कोरेगाव मतदारसंघातील मतदारराजाने मला प्रचंड मतानी विजयी करून माझ्या विकास कामाला पोचपावती दिली...
पत्नी वैशाली शिंदे या माझे औक्षण करताना.



राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी राष्ट्रवादी भवन येते स्वागत करताना..


कातगलेवाडी येथे सत्कार स्वीकारुन निवडणुकीत दिलेल्या भरभरून दिलेल्या मतांबद्दल ग्रामस्थांचे आभार व्यक्त करताना.


Wednesday, September 24, 2014

मंगळ मोहीम यशस्वी
भारतीय शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन !!!
#mangalyaan #isro #ncp #shashikantshinde



Monday, September 22, 2014

कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन _/\_
#Satara #NCP #ShashikantShinde


Sunday, September 21, 2014

सर्वसामान्य माणूस हेच माझे दैवत : शिंदे

कोरेगाव : 'मतदार संघातील सर्व सामान्य माणूस हेच माझे दैवत असून, खटाव, कोरेगावमधील कायमचा दुष्काळ हटविताना मोळ पंचक्रोशीच्या १७ गावांतील पाणीप्रश्न प्राधान्याने सोडवणे हाच माझा भविष्यातील अजेंडा आहे,' असे प्रतिपादन मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले.
मोळ चिंचणी, मांजरवाडी, विनायकनगर, अनपटवाडी, शिंदेवाडी, नागनाथवाडी, घाडगे मळा, फडतरवाडी, पांगरखेल, राजापूर, वेटणे, वेटणे मळा, रणसिंगवाडी, वर्धनगड व पवारवाडी येथील प्रचार दौर्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, युवा नेते कैलास घाडगे, माजी सभापती सतीश फडतरे, अरुण माने, माधव पवार, दत्ता गावडे, बाळासाहेब इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, 'पाच वर्षांचे मूल्यांकन केले, तर याठिकाणी विकासात्मक बदल झाला आहे. मतदार संघातील दुष्काळी भागाचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणे हाच माझा भविष्यातील अजेंडा आहे. जलसंधारणाची कामे करीत असताना प्राधान्याने येरळा नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करून नदीवर मोठे सिमेंट बंधारे बांधून कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविला जाणार आहे.'
सुनील घोरपडे म्हणाले, 'निवडणुका आल्या की, मतांचा जोगवा मागत फिरणार्‍यांनी मतदारसंघात कोणता विकास केला. कोणत्या योजना आणल्या, हे जनतेला सांगून आपले राजकीय अस्तित्व काय आहे, हे सिद्ध करावे.'
सतीश फडतरे म्हणाले, 'गेल्या ६0 वर्षांपासून रखडलेली विकासकामे शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून पाच वर्षांत झाली आहेत. बुध गट व डिस्कळ गणातील व खटाव विभागातील प्रत्येक गावात विकासात्मक कामे झाली आहेत.'
सभापती प्रभावती चव्हाण म्हणाल्या, 'खटाव विभागातील जनता सुज्ञ आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे ठामपणे राहतील. मंत्री शिंदे यांच्या माध्यमातून खटाव विभागात कोट्यवधींची विकासकामे होऊन येथील कायापालट झाला आहे.'
निसारभाई शिकलगार म्हणाले, 'गेल्या ५0 वर्षात जी कामे झाली नाहीत. ती कामे मंत्री शिंदेनी पाच वर्षांत केली आहेत. वर्धनगडच्या भार्गवराव तलावाची दुरुस्ती करून ५0 वर्षांत रखडलेले काम मार्गी लावून खर्‍या अर्थाने या मतदारसंघाचे पालकत्व सिद्ध केले आहे.'
यावेळी दिलीप काळंगे, रेखा जामदार, जयवंत घाडगे, गजानन वाघ, बाळासो नांगरे, मधुकर निकम, सुनील घोरपडे, बाबू जाधव, संपत गायकवाड, अशोक पवार, हणमंत गायकवाड, भगवान भोसले, भगवान मोरे, तानाजी गायकवाड, बाळासाहेब पवार, श्रीरंग फाळके उपस्थित होते.
#satara #koregoan Satara #shashikantshinde



महिला शक्ती ना. शशिकांत शिंदेंच्या पाठीशी
#shashikantshinde #ncp #koregoan #khatav #satara

Saturday, September 20, 2014

काल माझा खटाव विभागातील वाडी-वस्त्यांमध्ये दौरा पार पडला. दौरा सुरु असतानाच राजापुर येथील प्राथमिक शाळा सुटली होती . तेथील शाळेतील लहान मित्र-मैत्रीणींना बघून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मग काही वेळ त्यांच्यातच रमलो 
#Satara #NCP #ShashikantShinde



येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक पैन्शन संघटनेतर्फे सत्कार करून मला पाठींबा जाहीर. #satara #NCP - Maharashtra Water Resources Minister #ShashikantShinde

कोल्हापूर येथील राष्ट्रवादीच्या प्रचारसभेला प्रचंड असा प्रतिसाद भेटला .. या प्रचारसभेत मार्गदर्शन करताना...
#wewantncp #shashikantshinde #kolhapur #ncp


राष्ट्रवादीच्या प्रचारसभेला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद'

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जिंकून देण्याचं आवाहन केलं. या सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही सेना-भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीला जिंकून देण्याचं आवाहन करताना म्हणाले की, युपीए सरकार असताना साखरेला तीन हजार क्विंटल दर होता. आज तो २७०० रुपये झाला आहे. केंद्र सरकार साखरेचं धोरण आखत नाही. दहा वर्षांपूर्वी विधानसभेच्या सर्वात जास्त जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या होत्या. यावर्षीही आपणच जास्त जागा जिंकायच्या आहेत, या विचारानं काम करा. सरकार आल्यावर शंभर दिवसांत प्रलंबित कामं केली जातील. आमच्या हातात जे होतं, त्याबाबतीत आम्ही तातडीनं निर्णय घेतले. राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून दिल्या तर शंभर दिवसांत कोल्हापूरचा टोल माफ केला जाईल. जाती-पाती आणि गोताचा विचार सोडून द्या आणि फक्त घड्याळ्यावर शिक्का मारा.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अच्छे दिन आयेंगे असा वादा करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला तिथल्या जनतेनं नाकारलं, हे निवडणुकीच्या निकालांतून स्पष्ट झालं आहे. राज्यातील शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अनंत गिते दुष्काळाची पाहाणी करायला रस्त्यावर उभे राहून करतात. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारल्यावर आम्ही काय कपडे उतरवून शेतात जाऊ का, असा प्रतिप्रश्न करतात याकडे लक्ष वेधलं. पवारसाहेब मात्र गारपीटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी या वयातही शेतात उतरले होते, याची तटकरे यांनी आठवण दिली. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातील सर्वच्या सर्व जागा आपल्याला जिंकायच्याच आहेत, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना करताच त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनीही मोदी सरकार आणि सेना-भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. भाजप, शिवसेना यांच्याकडे सांगण्यासाठी काही नाही. म्हणूनच खोटं बोल, पण रेटून बोल ही नीती ते वापरत आहेत, असं भुजबळ यांनी सांगितलं. गुजराती लोक आकडेमोडीत पटाईत असतात. तरीही महाराष्ट्राचे घोटाळे सागंताना आकडे कसे चुकवता? अर्थसंकल्पापेक्षा जास्त आकड्यांचा घोटाळा कसा होऊ शकतो? महागाई झाली म्हणून सरकारी नोकरांना १७ टक्के महागाई भत्ता देता. मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या भावात फक्त २-३ टक्के वाढ कशी देता, असे सवाल भुजबळ यांनी मोदी सरकारला केले. हिंदूची काळजी करणाऱ्यांनी नाशिकच्या सिहंस्थ कुंभ मेळाव्याला एक रुपयाही अनुदान दिलेलं नाही. यांचा हिंदुत्ववाद फुटकळ निघाल्याचं भुजबळ (Chhgan Bhujbal) यांनी सांगितलं.

भाजप-सेनेच्या लोकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडायला लागली आहेत. डझनभर लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचा टोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लगावला. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं सन्मानानं पक्षात घेतलं आहे. भाजपनं असं कोणतं तीर्थ त्यांच्यावर शिंपडलं आणि हे लोक पवित्र झाले असा सवाल पाटील यांनी भाजप नेत्यांना केला. उद्धव ठाकरे यांची केविलवाणी अवस्था बघून बाळासाहेबांना काय वाटत असेल? बाळासाहेब असते तर त्यांनी कमळाबाईला दम भरला असता. स्वाभिमान जागृत असेल तर, भाजप गेली उडत स्वबळावर लढा असा सल्ला पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. राजू शेट्टींना शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हानही त्यांनी दिलं. रामदास आठवले आणि महादेव जानकर यांनी बहुजन समाजला आरएसएसच्या पायावर घालण्याचं जे पाप केलं, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधी माफ करणार नाही, असे खडेबोलही पाटील यांनी सुनावले.
#wewantncp #kolhapurrally




Monday, September 15, 2014

Today on 15th of September 2014 Engineers Day is being celebrated by India. This day is celebrated and marked as the birth anniversary of Sir M Vishweshwaraiah, he was noted as an Indian Engineer . In 1955 he was honored with Bharat Ratna. This day is celebrated by all the Engineers of India to give tribute to Sir M Vishweshwaraiah
#HappyEngineersDay

१५ वर्षांत झाला नाही एवढा विकास ५ वर्षात केला.
#satara #koregaon #shashikantShinde #NCP

Thursday, September 11, 2014

Monday, September 8, 2014

गेल्या वर्षी जून महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सातारा औद्योगिक वसाहत परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी १२ कोटीच्या निधी ला मंजुरी मिळाली आहे.
 #Satara_Development #Shashikant_Shinde #NCP





वर्णे गावाचा केला सर्वांगीण विकास!





Friday, August 1, 2014

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन _/\_




लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन _/\_


Thursday, July 31, 2014

माळीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेला विनाश हा अत्यंत दुर्दयी आणि दुखद आहे . संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गडप झाले आहे … या दु:खाच्या व संकटाच्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे.

Tuesday, July 29, 2014

श्रावण मास के शुक्ल पक्ष की तृतीया को श्रावणी तीज कहते हैं।जनमानस में यह हरियाली तीज के नाम से जानी जाती है।

रोजा' सब्र और इबादत का नाम है... 

गुनाहों से निजात का जरिया है... 

रहमतों की बारिश की विदाई का महिना है.....

ईद अकीदत के साथ अदा की गई अलविदा की नमाज का  दिन है ... 

मेरे सभी मुस्लीम भाई बहानोंको "ईद- ऊल - फित्र" मुबारक हो..


Monday, July 28, 2014



श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, 

क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। 

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे,

मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे।

श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!!