सर्वसामान्य माणूस हेच माझे दैवत : शिंदे
कोरेगाव : 'मतदार संघातील सर्व सामान्य माणूस हेच माझे दैवत असून, खटाव, कोरेगावमधील कायमचा दुष्काळ हटविताना मोळ पंचक्रोशीच्या १७ गावांतील पाणीप्रश्न प्राधान्याने सोडवणे हाच माझा भविष्यातील अजेंडा आहे,' असे प्रतिपादन मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले.
मोळ चिंचणी, मांजरवाडी, विनायकनगर, अनपटवाडी, शिंदेवाडी, नागनाथवाडी, घाडगे मळा, फडतरवाडी, पांगरखेल, राजापूर, वेटणे, वेटणे मळा, रणसिंगवाडी, वर्धनगड व पवारवाडी येथील प्रचार दौर्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, युवा नेते कैलास घाडगे, माजी सभापती सतीश फडतरे, अरुण माने, माधव पवार, दत्ता गावडे, बाळासाहेब इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, 'पाच वर्षांचे मूल्यांकन केले, तर याठिकाणी विकासात्मक बदल झाला आहे. मतदार संघातील दुष्काळी भागाचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणे हाच माझा भविष्यातील अजेंडा आहे. जलसंधारणाची कामे करीत असताना प्राधान्याने येरळा नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करून नदीवर मोठे सिमेंट बंधारे बांधून कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविला जाणार आहे.'
सुनील घोरपडे म्हणाले, 'निवडणुका आल्या की, मतांचा जोगवा मागत फिरणार्यांनी मतदारसंघात कोणता विकास केला. कोणत्या योजना आणल्या, हे जनतेला सांगून आपले राजकीय अस्तित्व काय आहे, हे सिद्ध करावे.'
सतीश फडतरे म्हणाले, 'गेल्या ६0 वर्षांपासून रखडलेली विकासकामे शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून पाच वर्षांत झाली आहेत. बुध गट व डिस्कळ गणातील व खटाव विभागातील प्रत्येक गावात विकासात्मक कामे झाली आहेत.'
सभापती प्रभावती चव्हाण म्हणाल्या, 'खटाव विभागातील जनता सुज्ञ आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे ठामपणे राहतील. मंत्री शिंदे यांच्या माध्यमातून खटाव विभागात कोट्यवधींची विकासकामे होऊन येथील कायापालट झाला आहे.'
निसारभाई शिकलगार म्हणाले, 'गेल्या ५0 वर्षात जी कामे झाली नाहीत. ती कामे मंत्री शिंदेनी पाच वर्षांत केली आहेत. वर्धनगडच्या भार्गवराव तलावाची दुरुस्ती करून ५0 वर्षांत रखडलेले काम मार्गी लावून खर्या अर्थाने या मतदारसंघाचे पालकत्व सिद्ध केले आहे.'
यावेळी दिलीप काळंगे, रेखा जामदार, जयवंत घाडगे, गजानन वाघ, बाळासो नांगरे, मधुकर निकम, सुनील घोरपडे, बाबू जाधव, संपत गायकवाड, अशोक पवार, हणमंत गायकवाड, भगवान भोसले, भगवान मोरे, तानाजी गायकवाड, बाळासाहेब पवार, श्रीरंग फाळके उपस्थित होते.
#satara #koregoan Satara #shashikantshinde

No comments:
Post a Comment