राष्ट्रवादीच्या प्रचारसभेला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद'
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जिंकून देण्याचं आवाहन केलं. या सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही सेना-भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीला जिंकून देण्याचं आवाहन करताना म्हणाले की, युपीए सरकार असताना साखरेला तीन हजार क्विंटल दर होता. आज तो २७०० रुपये झाला आहे. केंद्र सरकार साखरेचं धोरण आखत नाही. दहा वर्षांपूर्वी विधानसभेच्या सर्वात जास्त जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या होत्या. यावर्षीही आपणच जास्त जागा जिंकायच्या आहेत, या विचारानं काम करा. सरकार आल्यावर शंभर दिवसांत प्रलंबित कामं केली जातील. आमच्या हातात जे होतं, त्याबाबतीत आम्ही तातडीनं निर्णय घेतले. राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून दिल्या तर शंभर दिवसांत कोल्हापूरचा टोल माफ केला जाईल. जाती-पाती आणि गोताचा विचार सोडून द्या आणि फक्त घड्याळ्यावर शिक्का मारा.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अच्छे दिन आयेंगे असा वादा करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला तिथल्या जनतेनं नाकारलं, हे निवडणुकीच्या निकालांतून स्पष्ट झालं आहे. राज्यातील शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अनंत गिते दुष्काळाची पाहाणी करायला रस्त्यावर उभे राहून करतात. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारल्यावर आम्ही काय कपडे उतरवून शेतात जाऊ का, असा प्रतिप्रश्न करतात याकडे लक्ष वेधलं. पवारसाहेब मात्र गारपीटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी या वयातही शेतात उतरले होते, याची तटकरे यांनी आठवण दिली. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातील सर्वच्या सर्व जागा आपल्याला जिंकायच्याच आहेत, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना करताच त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनीही मोदी सरकार आणि सेना-भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. भाजप, शिवसेना यांच्याकडे सांगण्यासाठी काही नाही. म्हणूनच खोटं बोल, पण रेटून बोल ही नीती ते वापरत आहेत, असं भुजबळ यांनी सांगितलं. गुजराती लोक आकडेमोडीत पटाईत असतात. तरीही महाराष्ट्राचे घोटाळे सागंताना आकडे कसे चुकवता? अर्थसंकल्पापेक्षा जास्त आकड्यांचा घोटाळा कसा होऊ शकतो? महागाई झाली म्हणून सरकारी नोकरांना १७ टक्के महागाई भत्ता देता. मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या भावात फक्त २-३ टक्के वाढ कशी देता, असे सवाल भुजबळ यांनी मोदी सरकारला केले. हिंदूची काळजी करणाऱ्यांनी नाशिकच्या सिहंस्थ कुंभ मेळाव्याला एक रुपयाही अनुदान दिलेलं नाही. यांचा हिंदुत्ववाद फुटकळ निघाल्याचं भुजबळ (Chhgan Bhujbal) यांनी सांगितलं.
भाजप-सेनेच्या लोकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडायला लागली आहेत. डझनभर लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचा टोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लगावला. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं सन्मानानं पक्षात घेतलं आहे. भाजपनं असं कोणतं तीर्थ त्यांच्यावर शिंपडलं आणि हे लोक पवित्र झाले असा सवाल पाटील यांनी भाजप नेत्यांना केला. उद्धव ठाकरे यांची केविलवाणी अवस्था बघून बाळासाहेबांना काय वाटत असेल? बाळासाहेब असते तर त्यांनी कमळाबाईला दम भरला असता. स्वाभिमान जागृत असेल तर, भाजप गेली उडत स्वबळावर लढा असा सल्ला पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. राजू शेट्टींना शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हानही त्यांनी दिलं. रामदास आठवले आणि महादेव जानकर यांनी बहुजन समाजला आरएसएसच्या पायावर घालण्याचं जे पाप केलं, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधी माफ करणार नाही, असे खडेबोलही पाटील यांनी सुनावले.
#wewantncp #kolhapurrally

No comments:
Post a Comment